लांजा : हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल जावडे, हेरिटेज संस्था व गुहागर तेज अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०० विद्यार्थ्यांनी या सहभाग घेतला होता.
धनुर्विद्येचे शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत. धनुर्विद्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये लक्ष केंद्रित करणे, श्वासोच्छवास, एकाग्रता आणि कामगिरीच्या तंत्रांचे व्यवस्थापन, ताकद आणि दृढनिश्चय या बाबी विकसित होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात करिअर म्हणून या खेळाकडे पाहावे, यासाठी विशेष मार्गदर्शन घेतले. शिबिरातील विद्यार्थ्यांना अभिषेक पालशेतकर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी हेरिटेज संस्थेचे संस्थापक संतोष कांबळे, अध्यक्षा अॅड. अपर्णा पवार व तेज अकॅडमीचे प्रमुख ओंकार घाडगे, तसेच क्रीडा शिक्षक अमोल पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 12/Mar/2025














