Ramdas Kadam on Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला? हे ते सांगू शकत नाहीत. उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असा टोला रामदास कदमांनी ठाकरेंना लगावला. उध्दव ठाकरेंना आता टीका करण्याचेच काम आहे. ते भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. केलेल्या कर्माची फळं उध्दव ठाकरेंना भोगावी लागतील असेही कदम म्हणाले.
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही
बजेटच्या मुद्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बजेट हे पक्षाचे नसते, उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? असे रामदास कदम म्हणाले. टीका करण्याचा उद्धव ठाकरेंचा धंदा सुरु राहुदेत असेही ते म्हणाले. भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे रामदास कदम म्हणाले. कर्नाटकमध्ये जाऊन मराठी किंवा हिंदी बोलून दाखवा असंही ते म्हणाले. तिथे बोलता येत नसेल तर मुंबईत इतर भाषा का? असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला.
संजय कदम पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन
माजी आमदार संजय कदम (Former MLA Sanjay Kadam) यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन असेही रामदास कदम म्हणाले. कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 12-03-2025














