देवरूख : आजच्या प्रत्येक स्त्रीने झाशीची राणीच्या चरित्रातून प्रेरणा घेणे किती गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजेंद्र माने महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा नेहा माने यांनी केले. आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुजोक अल्टरनेट थेरेपी या अनोख्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील वुमन डेव्हलपमेंट सेल आणि डी.एल एल.ई. या संघटनांद्वारे हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी आश्लेषा जाधव हिने केले. प्राध्यापिका प्रियांका बनकर यांनी मेहंदी स्पर्धेची जबाबदारी पार पाडली.
महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा नेहा माने, ईशानी माने, प्रमुख अतिथी नीलिमा दिघे, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. वुमन डेव्हलपमेंट सेलच्या अध्यक्षा प्राध्यापिका पूनम क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापिका शुभांगी कांबळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्व उपस्थित विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग यांना शुभेच्छा दिल्या.
नीलिमा दिघे, सुजोक थेरपीस्ट यांनी सुजोक थेरपी, आपल्या हात आणि पायांवरील बिंद्वंद्वारे आपल्या आरोग्यावर कशी परिणामकारक आहे, यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता प्रमुख अतिथी नीलिमा दिघे यांच्या हस्ते मेहंदी स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देऊन करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 12/Mar/2025














