खेड रेल्वेस्थानकासह दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक स्थानकात चोऱ्या रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क

खेड : कोकण मार्गावर रेल्वेगाडयातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील चैन मंगळसूत्र हिसकावण्यासह पर्समधील दागिने लंपास करण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. विशेषतः खेड रेल्वेस्थानकासह दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक स्थानकात सातत्याने चोऱ्याच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तीनही स्थानकात आता गस्त घालण्यात येणार असून यासाठी २४ एसआरएफचे जवान रविवारपासून तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांची कुमकही दिमतीला राहणार आहे.

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यातून खिडकीजवळ बसून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांकडून मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सुरू आहेत. याशिवाय महिला प्रवासी डब्यातील आसनावर झोपल्या असल्याची संधी साधत डोक्याखालील सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स लांबवण्याच्या घटना देखील घडत आहेत. सततच्या चोयांमुळे प्रवाशी विशेषतः महिला प्रवासी मेटाकुटीस आले असून भीतीचे वातावरण कायम आहे.

सहा दिवसांपूर्वीच मडगाव-नागपूर स्पेशलसह तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या चार लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत पलायन केले. या दोन्ही घटना खेड रेल्वेस्थानकासह कळंबणी बुद्रुक स्थानकात रेल्वेगाड्या क्रॉसिंगसाठी बांबल्या असताना घडल्या होत्या. यापूर्वीही खेड रेल्वेस्थानकासह दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक रेल्वेस्थानकात रात्री व पहाटेच्या सुमारास रेल्वेगाड्या बांबत्त्या असताना खिडकीजवळ बसलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले होते.

तीन स्थानकांमध्ये आतापर्यंत घडलेल्या एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. अज्ञात चोरट्यांनी खेड, दिवाणखवटी व कळंबणी बुद्रुक रेल्वेस्थानक ‘टार्गेट’ केले आहे. यापूर्वी कोकण मार्गावर जलदगतीने धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस चोरट्यांच्या हिटलिस्टवर होती. १५ दिवसात ६ घटनांमध्ये साडेतीन लाखांच्या सोन्याच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. तरीदेखील रेल्वे पोलिसांची यंत्रणा सुस्तच होती.

कोकणकन्यापाठोपाठ मंगळूर एक्स्प्रेसलाही चोरट्यांच्या टोळीने दिवाणखवटी रेल्वेस्थानकाला ‘टार्गेट’ करत महिलांच्या गळपातील मंगळसूत्र खेचून पोबारा करण्याचे सत्र सुरुच ठेवले होते. यापाठोपाठ आत्ता तुतारी एक्सप्रेससह मडगाव-नागपूर स्पेशललाही चोरट्यांनी ‘लक्ष्य’ केले आहे. पहाटेच्या सुमारास सर्रास प्रवासी झोपेत असतात. हीच संधी साधून चोरटे महिलांचे मंगळसूत्र हिसकावत आहेत. कोकण मार्गावर रेत्त्वेगाडयातील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांनी प्रवासी जेरीस आलेले असतानाच पोलीस यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

येत्या चार दिवसातच शिमगोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांची टोळी सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर चोऱ्यांच्या घटनांना आळा घालून टोळीला जेरबंद करण्यासाठी आरसीएसचे जवानांसह स्थानिक पोलीस पुढे सरसावले आहेत. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली खेडसह दिवाणखचटी, कळंबणी बुद्रुक रेलवेस्थानकात आरसीएफच्या जवानांसह स्थानिक पोलिसांची कुमक तैनात केली आहे.

तीनही रेल्वेस्थानकात आता आरसीएफच्या जयानांसह स्थानिक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. दिवस-रात्र दोन्ही पथके त्या-त्या स्थानकात जागता पहारा देणार आहेत. यामुळे रेल्वेगाड्यांतून शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 12/Mar/2025