खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १८ मार्च आरोग्य शिबिर

खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १८ मार्च रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या कालावधीत आर बी एस के आरोग्य संदर्भसेवा आरोग्य सेवा शिबिर आयोजित केले आहे. सदर शिबिरात खेड तालुक्यातील ०-१८ वयोगटातील विविध आजारांनी ग्रस्त बालकांवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत तपासणी व उपचार तसेच आवश्यक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील आजारी बालकांनी तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या बालकांनी सदर मोफत आरोग्य संदर्भ शिबिराचा लाभ घ्यावा.

तसेच अनंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लब मार्फत मोफत प्रोटीन पावडर, टॉनीक तसेच अन्य औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.

असे आवाहन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी सगरे, डॉ. विलास शेळके, डॉ. मळणगावकर यांनी केले आहे. तसेच अनंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लब मार्फत मोफत प्रोटीन पावडर, टॉनीक तसेच अन्य औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 12/Mar/2025