खेडमध्ये आढळला बांगलादेशी नागरिक

खेड : तालुक्यातील कळंबणी आपेडेफाटा हॉटेल स्वामीलीला जवळील साईटवर काम करताना आढळून आलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला येथील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई ११ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:३५ च्या सुमारास करण्यात आली.

अकबर अबू शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरीकाचे नाव आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबनी, आपेडेफाटा, हॉटेल स्वामीलीला जवळील साईटवर, ता. खेड,., मूळ गाव पेडोली, तहसील चौदलपूर, ठाणा अभयनगर, जिल्हा जेशुर, राज्य ढाका, देश-बांगलादेश) हा बांगलादेशातील गरीबीस व उपासमारीस कंटाळून उदरनिर्वाहाकरीता भारताचे सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून व मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय भारत देशात अवैध प्रवेश करून कळंबणी हद्दीतील आपेडेफाटा, हॉटेल स्वामीलीला जवळील साईटवर काम करताना मिळून आला.

याबाबतची फिर्याद दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरीचे पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार, खेड पोलिसांनी ११ मार्च २०२५ रोजी राजी ८:०५ वाजता बांगलादेशी नागरीक अकबर अबू शेख याच्याविरोधात पारतंत्र भारतात प्रवेश अधिनियम १९५० चा नियम ३ सह ६, परकीय नागरीक आदेश १९४८ परि. ३ (१) (अ), परकीय नागरीक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 12/Mar/2025