कोकण रेल्वे मार्गे बिहारसाठी होळी विशेष गाडी

रत्नागिरी : होळीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील वास्को द गामा आणि पाटण्या दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. गोव्यातून सुटणारी ही गाडी रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण, भुसावळ मार्गे पाटण्याला रवाना होणार आहे.

या बाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्रमांक 07311 वास्को द गामा – पाटणा एक्स्प्रेस विशेष गाडी वास्को द गामा येथून मंगळवार, 11 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता सुटून बिहारमध्ये पाटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 07312 पाटणा – वास्को द गामा एक्स्प्रेस विशेष पाटणा येथून शनिवार, 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वा. 40 मिनिटांनी सुटून वास्को द गामा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचेल.

ही विशेष रेल्वे गाडी मडगाव जंक्शन, थिवीम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि डाणापूर स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला एकूण 20 एलएचबी डबे असतील यात 1 द्वितीय श्रेणी एसी, 5 तृतीय श्रेणी एसी, 12 शयनयान (स्लीपर), 1 जनरेटर कार आणि 1 एसएलआर असे डबे जोडले जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 12-03-2025