रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणाऱ्या इको कारला धडक देत अपघात केला. यात बत्तीस शिराळा येथील दोघांना दुखापत झाली. अपघाताची ही घटना रविवार ९ मार्च रोजी दुपारी २.३० वा. सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट येथे घडली. शंकरप्रसाद रामचंद्र कुशवाह (वय २६, रा. धनवार बरसोट हजारीबाग, झारखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत दीपक रामचंद्र जोशी (रा. बत्तीस शिराळा, सांगली) यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रविवारी दीपक जोशी त्यांचा पुतण्या अनिल जोशी तसेच मित्र बाबासाहेब सांगरुळकर व रामचंद्र गुरव सर्व (रा. बत्तीस शिराळा, सांगली) हे देवदर्शनासाठी इको कार (एमएच-१०-बीएम-८३२३) ने गणपतीपुळे येथे आले होते. ते आंबा घाटात कळकदरापासून पुढे कोल्हापूरकडे येताना दुपारी २.३० वा. सुमारास कोल्हापूर ते रत्नागिरी येणारा ट्रक (केए-२३-बी-१६११) वरील चालकाने समोरुन त्यांच्या कारला धडक देत अपघात केला. यात अनिल जोशी आणि रामचंद्र गुरव यांना दुखापती झाल्या असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातानंतर संशयित ट्रक चालकाने तिथून पळ काढला. अपघातप्रकरणी अधिक तपास देवरुख पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 13/Mar/2025














