◼️ त्यांच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही : अजिंक्य मोरे
रत्नागिरी : असे किती येतात आणि जातात संजय कदम यांनी स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करावी शिवसेना ( उबाठा ) ची मशाल जिल्ह्यात कायम धागधगतच राहील असे प्रत्युत्तर युवा सेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी आज दिले आहे.
पक्ष सोडून गेलो तर काय फरक पडतो ते पुढे कळेल.. असे वक्तव्य करणारे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केलेले माजी आमदार संजय कदम यांच्या पहिल्यांदाच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवर युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी चे जिल्हाप्रमुख तसेच माजी आमदार संजय कदम यांची पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून पक्षातून हकालपट्टी ची कारवाई त्यांच्यावर केली. या कारवाईनंतर माजी आमदार आणि माझी जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. हे प्रतिक्रिया देत असताना पक्ष सोडून गेलो तर काय फरक पडतो ते पुढे कळेल असे विधान त्यांनी केले आहे. तसेच यापूर्वी कित्येक वर्ष त्यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले रामदास कदम यांच्या पायघड्या घालण्याच्या वक्तव्याचे त्यांनी स्वागत देखील केले.
एका वाहिनीला फोनवरून माहिती देताना आपली बाजू समजून न घेता पक्षाने हकालपट्टी केली आपण कसलाही निर्णय घेतला नव्हता, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आज पक्ष सोडून गेल्यावर काय फरक पडतो ते पुढे कळेल असे बोलत विरोधकांच्या भूमिकेचे स्वागत देखील केले. यावरून पक्षांनी त्यांच्यावर केलेली हकालपट्टीची कारवाई योग्यच आहे. संजय कदम यांच्यासारखे किती आले आणि किती गेले मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा काहीही फरक पडलेला नाही आणि कधी पडणार देखील नाही. कोणी कोणत्या पक्षात जायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण जिथून जात आहोत त्या पक्षाबद्दल अशा प्रकारचे विधान करणे हे राजकीय दृष्ट्या अशोभनीय आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो उलट पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते तळमळीने जागे होऊन पक्ष वाढीसाठी काम करतात. हे संजय कदम यांनी लक्षात घ्यावे, अशी प्रतिक्रिया अजिंक्य मोरे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 13-03-2025














