रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलला; एकावर कारवाई

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा उपमर्द केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार दि. ९ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वा. कालावधीत करण्यात आली. राजू ऊर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. एमआयडीसी फिनोलेक्स कॉलेजजवळ, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांकडील अपील ४/२०२३, चे दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजीचे आदेशाचा उपमर्द केला. तसेच त्याने उविभागीय अधिकाऱ्यांकडील केस क्रमांक निर्वाह अर्ज १/२०२१ दि. १३ जानेवारी २०२२ च्या आदेशाचाही उपमर्द केल्याचे दिसून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 13/Mar/2025