चिपळूण : चिपळूणचे पर्यावरण व निसर्गप्रेमी विश्वास तथा भाऊ काटदरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसुंधरा साथी पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आले. नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी भाऊ काटदरे यांनी गेली अनेक वर्षे संशोधन व अभ्यास करून उपक्रम राबवले. तसेच कासव संवर्धन मोहीम सुरू केली. काटदरे यांनी प्लास्टीक मुक्त शहरे व गावे हा उद्देश ठेवून गाव खेड्यापासून शहरात प्लास्टीक गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला.
नागरी सदनिकांमधील कचऱ्यापासून छोटे खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. चिपळूणसह अनेक ठिकाणी काटदरेंच्या मार्गदर्शनाखाली घरगुती कचरा खत प्रकल्प उभारले. काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण व निसर्ग संवर्धन विषयक उपक्रमांची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसुंधरा साथी सन्मानाने गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 13/Mar/2025









