गुहागर : सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे काम वेगाने सुरू आहे. ठेकेदार स्थानिक प्रशासनाला, ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करीत असल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणादेखील कंत्राटी काम असल्याने दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे गुहागर तालुकावासीयांच्या उपस्थित करीत आहेत
रस्त्याच्या कडेने खोदाई करून भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरक्षेची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत, तालुक्यातील असगोली गावातील तीव्र उताराच्या अरुंद रस्त्यावर खोदाई केलेली माती टाकल्याने दुचाकीस्वार पसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गुहागर शहरात रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्धात पडून असगोलकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. आजही हा तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. गुहागर शहरातील खालचापाट परिसारात खोदाईचे काम करताना जलवाहिनी फुटली, पालशेतमध्ये गटारातच खोदाई सुरू होती. हे थांबविण्याचा प्रयत्न करणाग्या ग्रामस्थांना ठेकेदार कंपनीच्या महिला अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
महावितरणची भूमिगत वाहिनी जमिनीपासून ४ फूट खोल टाकायची असताना अनेक ठिकाणी २-३ फुटांवर टाकण्यात आली आहे. कोणल्याही पुलावरून, मोऱ्यावरून वाहिन्या नेताना केबल पॅरापेट किंवा रेलिंगच्या बाहेरील बाजूने लोखंडी क्लॅपच्या साहाय्याने वाहिनी टाकण्याचे शासकीय निर्देश आहेत. मात्र, हे ठेकेदार पुलावरून वाहिन्या टाकून त्यावर कॉक्रिटीकरण करीत आहेत.
ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्याकडून शिवीगाळ
पालशेत गावात गटाराचे काम मंजूर झाल्याने येथे चेंबर बांधू नका, असे सांगायला गेल्यावर झालेल्या वादात ठेकेदार कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी आपल्याला शिवीगाळ केली. हे सर्व ग्रामपंचायत अधिका-यांसमोर घडले, तरीही त्यांनी चकार शब्द काढला नसल्याची माहिती पालशेत येथील विजय नागवेकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 13/Mar/2025














