रत्नागिरी : जिल्हयातील जेष्ठ नागरीकांसाठी नविन हेल्पलाईन नंबर सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील जेष्ठ नागरीकांना कुठल्याही संकटाच्या वेळी तसेच त्यांचे तक्रारींचे / अडचणीचे निवारण होवून त्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळावी या हेतूने पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांचे संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे वतीने जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षेसाठी 8390929100 हा नविन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp) सुध्दा उपलब्ध आहे.

घरातील तरुण पुरुष व महीला या नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई व इतर शहरांमध्ये वास्तव्यास असल्याने घरामध्ये जेष्ठ नागरीक हे एकटेच असतात तसेच निराधार जेष्ठ नागरीक हे सुध्दा घरामध्ये एकटेच असतात अशावेळी जेष्ठ नागरीकांचे तात्काळ मदतीसाठी व त्यांचे तक्रारींचे / अडचणीचे निवारण करण्यासाठी सदरचा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात येत आहे. सदरच्या नंबर हा 24 तास सुरु असणार आहे. जेष्ठ नागरीक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून त्यांचे सुरक्षेची प्राधान्यांने काळजी घेण्यासाठी रत्नागिरी पोलीस कटीबध्द आहेत.

जेष्ठ नागरीकांनी तात्काळ मदतीसाठी 8390929100 या हेल्पलाईन नंबर वर फोन किव्हा व्हॉट्सअॅप मेसेज करण्याबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे- श्री. धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 13/Mar/2025