मंडणगड : ढोल-ताशांच्या तालावर ताचतायत ग्रामदेवतेच्या पालख्या

मंडणगड : तालुक्यात शिमगा सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, पालखी महोत्सवात खेळ्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ग्रामदेवतेच्या पालख्या नाचवल्या. या वेळी जल्लोष आणि जयजयकाराने शहर परिसर दणाणून गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न राजे ग्रुप मंडणगड यांच्या वतीने परकार कॉम्पलेक्स परिसरात पालखी महोत्सव उत्साहात झाला.

या महोत्सवात कोंझर, बोरघर, टाकवली, आंबवणे खुर्द, वडवली, माहु आदी गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्यांनी भाग घेतला व पालखी नृत्यकलेचे सादरीकरण केले. याचबरोबर तांबडीकोंड येथील खेळ्यांनी कोळीनृत्यांचा कार्यक्रम सादर करून मर्दानी खेळ सादर केले. आयोजकांनी सर्व पालख्यांचा गौरव केला. या वेळी रवींद्र पवार, मदन दळवी, सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सदानंद नगरकर, माजी पोलिस उपनिरीक्षक संतोष नगरकर, जितेंद्रसिंग गौड यांच्यासह या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर या महोत्सवासाठी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 13/Mar/2025