रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात ठिकठीकाणी होळ्या उभ्या राहिलेल्या असताना नागरिकांना आजची सकाळ पुन्हा एकदा थंडीची आठवण करून देणारी ठरली. रत्नागिरी शहरात आज पहाटेपासून दाट धुके पडलेले पहावयास मिळाले.
शहरात देखील धुके दाट होते कि दृश्यमानता अत्यंत कमी झालेली पहावयास मिळत होती. अवघ्या दीडशे फुटावरचे देखील स्पष्ट दिसत नव्हते. मागील दोन दिवस सूर्य आग ओकत होता. रत्नागिरी शहरातील तापमानाने अक्षरशः चाळीशी देखील गाठली होती. त्यात आज सकाळी मोर्निग वॉक साठी बाहेर पडलेल्या नागरिकांना थंड वातावरणाची अनुभूती मिळाली.
आज सकाळी रत्नागिरी शहरात २४ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. रुतुचाक्रानुसार, होळी दरम्यान उन्हाळ्याला सुरुवात होते. याच दरम्यान तपामानांत वाढ होताना दिसते, मात्र आज अचानक पडलेल्या धुक्याने सगळ्यांनाच अचंबित करून सोडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 14-03-2025














