Nilesh Rane : 16 व्या वित्त आयोगातून महाराष्ट्रासाठी केंद्राकडून भरीव तरतुदीची मागणी करावी; राज्याची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आ. निलेश राणे यांनी अधिवेशनात मांडला महत्त्वाचा मुद्दा

रत्नागिरी : Nilesh Rane : राज्याच्या उत्पन्नातून केंद्राला महाराष्ट्रातून भरीव वाटा मिळत असतानाच आता नव्या वित्त आयोगातून केंद्राकडून मिळणाऱ्या वाट्यातून 2 टक्क्याची वाढीव मागणी केल्यास आपल्या राज्याची वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होईल, असे अभ्यासपूर्ण मत कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाला केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षानेही दाद दिली.

सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. यावेळी आ. निलेश राणे यांनीही आपले भाषण करताना अत्यंत वेगळे आणि तितकेच अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वळवले.

यावेळी बोलताना आ. राणे म्हणाले की, पंधराव्या वित्त आयोगाची मुदत या सन 2025 -26 च्या कालावधीमध्ये संपुष्टात येणार आहे. सध्या या अर्थसंकल्प या वित्त आयोगाचे हे शेवटचं वर्ष आहे अशा वेळेला

महाराष्ट्राचा जो आपण 37 38% शेअर महाराष्ट्राकडनं केंद्राला जातो मात्र आपल्याला त्या बदल्यात किती मिळतो याचा अभ्यास पूर्ण मुद्दा आमदार आणि मांडला ते म्हणाले

उत्पन्नातील वाटा 37 38% आहे मात्र केंद्राकडून आपल्याला किती मिळतो याबाबत बोलताना ते म्हणाले 2011 12 ला तेराव्या मध्ये

तेरावा वित्त आयोगामध्ये 5.1 चौदाव्या वित्त आयोगामध्ये 5.5 आणि 21 6.3 15 व्या वित्त आयोगातून आपल्याला वाटा मिळतो आपण किती देतो किती घेतो फेडरल स्ट्रक्चर मध्ये आपण राहतो आपण आर्टिकल टू एटी बिहार सारखे राज्य सलग दहा टक्के उत्तर प्रदेश तेराव्या वित्त आयोगात 19.6 14 व्या वित्त आयोगात 17.9 आणि 15 वित्त आयोगात 17.9 इतका शेअर त्यांना केंद्राकडून मिळतो त्यामुळे मध्य प्रदेश 7.8 इतका वाटा त्याला मिळतो त्यामुळे आपण सुद्धा माहितीची पूर्ण ताकद लावून केंद्राकडून दोन टक्के वाढवावेत नवीन जे 16 व्या वित्त आयोग तयार होईल विचारात घेऊन पाच वर्षांमध्ये किती टक्क्यावर महाराष्ट्र राहील त्यामुळे आत्ताच याबाबत किमान दोन टक्के वाढवावे 8.3% पर्यंत आपल्या शेअर वाढवावा 37 38 टक्के दिले तरी आपल्याला आठ पॉईंट तीन टक्के मिळाले तरी फिस्कल पैसे वित्तीय तूट आहे ती भरून निघण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 14-03-2025