मुंबई : ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रीक बस पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाने इशारा दिला आहे. करारानुसार बस पुरवठा होत नसल्याने कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
22 मे 2025 पर्यंत 1 हजार 287 ईव्ही बस पुरवण्याचा आदेश दिला असून त्याचे उल्लंघन झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महामंडळ आणि कंपनीमध्ये 2 वर्षांत 5 हजार 150 बस पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार महिन्याला 215 बस महामंडळास देणं अपेक्षित आहे. जानेवारी 2025 पर्यंत ईव्ही ट्रान्सकडून 1 हजार 935 बस येणं अपेक्षित होतं. पण गेल्या सहा महिन्यांत एकही गाडी एसटीच्या ताफ्यात दाखल नाही. त्यानंतर आता एसटी महामंडळाने कंपनीला कडक शब्दात इशारा दिला आहे.
ईव्ही ट्रान्सकडून आतापर्यंत फक्त 220 बसचाच पुरवठा करण्यात आला आहे. आता 22 मे पर्यंत करारानुसार बस पुरवठा न झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. ईव्ही ट्रान्सला महामंडळानं पाठवलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 14-03-2025
