रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 20 मार्च रोजी क्षेत्रीय स्तरावरील 61 वी डाक अदालत सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, पत्ता इत्यादी.
तरी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक डाक निदेशक 1, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी 403001 यांच्या नावे अतिरिक्त प्रतिसह 12 मार्च 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावे. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 14-03-2025
