खेड : शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

खेड : तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे विकासकामांसह प्रशासकीय कामेही खोळंबली आहेत.

विकासकामे करण्यासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने तालुक्याचा विकास अत्यंत मंदगतीने सुरू आहेत. ही पदे तत्काळ भरा अन्यथा १ मे रोजी भरणेनाका येथे उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.

पंचायत समितीत सहा महिन्यांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपअभियंता नसल्याने सामान्य जनतेची कामे रखडली आहेत. अनेक ग्रामपंचायतीत पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायतींची कामेही रखडली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 15/Mar/2025