होळीसह विकेंडवार! मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर आणि माणगाव-पुणे राज्यमार्गावर शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शिंगणापूरच्या शिंगोत्सवासाठी गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

इंदापूर, माणगाव आणि आसपासच्या भागांत वाहतूक ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

परतीच्या प्रवासाला निघालेले प्रवाशी पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

13 मार्च रोजी लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत होळी साजरी करण्यासाठी त्यांच्या गावी गेलेले चाकरमानी पुन्हा मुंबईस, आपल्या नोकरीच्या ठिकाणी परतत आहेत.

दरम्यान, होळीसह शनिवार रविवार जोडून आल्याने विकेंड घालवण्यासाठी कोकणात, मुंबईस व पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 15-03-2025