खेड बसस्थानकाचे उद्या भूमिपूजन

खेड : खेड गोळीबार मैदानात नवीन बसस्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. या बसस्थानक कामाचा भूमिपूजन सोहळा १६ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, भास्कर जाधव, किरण सामंत, ज्ञानेश्वर म्हात्रे, शेखर निकम यांच्यासह परिवहन आयुक्त भिमनवार, परिवहनचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रज्ञेश बोरसे, कार्यकारी अभियंता मीनल सोनवणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर