राजापूर : राजापूरची शांततेची व जातीय सलोख्याची परंपरा कायम राखावी असे आवाहन करतानाच सोशल मिडियावर कुणीही चुकीच्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नयेत, सगळया ग्रुप एडमिन यांनी आपले ग्रुप हे ओनली एडमिन कॅन सेंट मेसज सेटींग करावेत असे आवाहन राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.
राजापुरात बुधवारी घडलेल्या वादानंतर व सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या वेगवेगळया मेसेच आणि भविष्यात असणारे सण या पार्श्वभूमिवर तहसीलदार विकास गंबरे यांनी शनिवारी तालुका शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. तहसीलदार दालनात झालेल्या या बैठकीला उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना तहसीलदार गंबरे यांनी शहर आणि तालुक्याची शांतता अबाधित राखण्याची आपली प्रत्येकाची जबाबदीरी आहे. घडलेल्या घटनांप्रकरणी पोलीस प्रशासन योग्य प्रकारे चौकशी करून कायदेशी प्रक्रिया अवलंबून कार्यवाही करत आहे. मात्र तरीही आपण सगळयांनी समाजातील एक प्रमुख घटक म्हणुन पुढाकार घेत दोन्ही समाजात कशा प्रकारे एकोपा टिकून राहिल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तर सोशल मिडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर चुकीचे मेसेज, व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबतही सायबर सेलकडून योग्य ती कार्यवाही केली जात आहे. मात्र आपण एक जागरूक नागरिक म्हणून अशा मेसेजना पायबंद घातला पाहिजे, तसेच जे काही आपले सोशल मिडियाचे ग्रुप असतील त्यावर असे मेसेज फॉरवर्ड करण्याऱ्यांना सुचना द्याव्यात, पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, व सगळे आपले ग्रुप हे ओनली एडमिन कॅन सेंट मेसज सेटींग करावेत असे आवाहन त्यांनी केले. याबाबत आपण सगळयांना कल्पना द्यावी असेही आवाहन त्यांनी केले.
तर सोमवारी साजरी होणारी शिवजयंती उत्सव, रमजान सण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा व अन्य सर्वच सण हे परंपरेनुसार शांततेत साजरे करावेत, प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहनी गंबरे यांनी केले.
यावेळी बोलताना उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील शांततेचे आवाहन केले व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपण थेट पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे, जयप्रकाश नार्वेकर, लियाकत काझी, सुलतान ठाकूर, महादेव गोठणकर, आजिम जैतापकर, हुसैन मुंगी, मधुकर पवार, विनय गुरव यांनी आपली मते मांडली.
या बैठकीला राजापूर अर्बन बँक अध्यक्ष संजय ओगले, राजापुरातील मुस्लीम समाज पाच मोहल्ला समिती अध्यक्ष शौकत नाखवा, अनिक कुडाळी, सुभाष पवार, सुरेंद्र तांबे, प्रसन्न मालपेकर, विजय हिवाळकर, लियाकत काजी, कलिम चौगुले आदींसह हिंदू मुस्लीम समाजातील व्यापारी, नागरिक व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 15/Mar/2025
