आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूरात सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

राजापूर : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त एन. आर. प्रतिष्ठानच्या वतीने राजापूरात १७ मार्च रोजी विविध ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार राहिलेल्या आमदार निलेश राणे यांचा राजापूर तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे. राणे जरी कुडाळ मालवणचे आमदार असले तरी त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दांडगा संपर्क आहे. त्यामुळे कार्यकत्यर्चाच्या आग्रहास्तव राणे राजापूर तालुक्यात येत असतात. आमदार निलेश राणे यांच्याशी असलेल्या भावबंधातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये सकाळी १० वाजता राजापूर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळवाटप, दुपारी वात्सल्यमंदिर ओणी येथील अनाथ आश्रमात खाऊ वाटप, अरविंद लांजेकर यांचे सौजन्याने कोंढेतड शाळेत खाऊ वाटप तसेच वसंत पाटील यांच्या सौजन्याने कशेळी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तर समीर खानविलकर मित्रमंडळाचे वतीने पाचल येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कबड्डी स्पर्धेचा सांगता सोहळा मंगळवारी दि. १८ रोजी सायंकाळी पाचल येथे होणार असून या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे उपस्थीत राहणार असून यावेळी ते वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 15/Mar/2025