रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आज (१५ मार्च) आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये जाऊन त्यांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
आशादीप संस्थेमध्ये जवळपास ३० मतिमंद व्यक्ती असून, त्यांना टॉवेल, तेल, टूथपेस्ट, खाऊ अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख मयुरेश पाटील, किरण तोडणकर, शशिकांत बारगुडे, सचिन सावंत देसाई, अमित खडसोडे, शकील मालदार, साजिद पावसकर, राजू सुर्वे, सुनील सकपाळ, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, विजया घुडे, उन्नती कोळेकर, सेजल बोराटे, राजश्री लोटणकर, हीना दळवी, दिव्या पडवळ, रमीजा तांडेल, सालीया वस्ता आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे जपलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल आशादीप संस्थेचे दिलीप रेडकर आणि कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांना निरोगी आयुष लाभो, अशी सद्भावना यावेळी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 15/Mar/2025
