सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोडो रुपयांच्या दारुवर रोलर चालवला आहे. दारुसाठा नष्ठ करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने करोडो रुपयांचा दारुसाठा नष्ठ केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा गोवा बनावटीची दारु राजरोसपणे येत आहे.
सन 2018 ते 2024 दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने तब्बल 2 कोटी 69 लाख 22 हजार 792 रुपये किमतीची गोवा बनावटीचा जप्त केलेल्या अवैध दारुसाठ्यावर रोलर चालवला.

ओरोस येथील शासकीय जागेत न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

कुडाळचे निरीक्षक मिलिंद गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

गोवा राज्यातून सिंधुदुर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावत अवैध दारु येते, यावर कारवाई करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागानं आक्रमक पवित्रा घेत जप्पत केलेला दारुसाठा नष्ठ केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 15-03-2025
