रत्नागिरी : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change)होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा (Heat) चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे, आज सोलापुरचा पारा 41 .1 अंशावर पोहोचला आहे.
तसेच कोकणातही सातत्यातनं तापमानात बदल होत आहे. यामुळं आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
तळकोकणात हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. मध्येच उष्णता तर थंड वातावरण बघायला मिळतंय. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तापमानात सातत्याने वाढ देखील होताना दिसतेय. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार तळकोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दमट वातावरणाचा फटका आंबा, काजू, जांभूळ या पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 15-03-2025
