रत्नागिरी : शहरानजीकच्या कोकणनगर येथील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार १४ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महादेव (पूर्ण नाव गाव माहीत नाही) हा खबर देणार यांच्या कोकणनगर येथील बिल्डिंग साईवर कामाला होता. शुक्रवारी रात्री तो कोकणनगर येथील ग्रीन पार्कच्या बाजुला असलेल्या पायवाटेवर बेशुध्द अवस्थेत दिसून आला. त्यामुळे खबर देणार यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री १० वा. त्याला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 17/Mar/2025














