रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथे बेदरकारपणे कार चालवून समोरुन येणाऱ्या कारला धडक देत अपघात केला. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार १२ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सहाय्यक पोलिस फौजदार संजय शिवगण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हे आपल्यात ताब्यातील कार (एमएच-१२-एलजे-४७३३) घेउन रत्नागिरी ते गणपतीपुळे असे जात होते. त्याच सुमारास अज्ञात कार चालक गणपतीपुळे ते रत्नागिरी असा समोरुन येत होता. ही दोन्ही वाहने काळबादेवी येथील एका बिअर शॉपी समोर आली असता त्या अज्ञात चालकाने फिर्यादीच्या कारला धडक देत अपघात केला. अपघातानंतर तो न थांबता निघून गेला. यात फिर्यादीच्या कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 17/Mar/2025














