गणपतीपुळे येथील स्मशानभूमी समोरील समुद्रकिनारी आढळला अज्ञाताचा मृतदेह

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील स्मशानभूमी समोरील समुद्रकिनारी अज्ञाताचा मृतदेह मिळून आला. ही घटना शनिवार 15 मार्च रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास निदर्शनास आली.

याबाबत खबर देणारे हे जिवरक्षक आहेत. ते शनिवारी सकाळी गणपतीपुळे मंदिर ते हॉटेल अभिषेक समोरील जयगड ते रत्नागिरी जाणार्‍या रस्त्याच्या खालच्या बाजस समुद्राकडे येणार्‍या पाखाडीमध्ये गस्त करत होते. त्यावेळी त्यांना तेथील स्मशानभूमी समोरील समुद्रकिनार्‍यावरील वाळूवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह दिसून आला. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 17-03-2025