डी. जे. सामंत महाविद्यालयात सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन

रत्नागिरी : डी. जे. सामंत महाविद्यालय पाली रत्नागिरी आणि पिल्लई एज्युकेशन इन्स्टिट्यूट रसायनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयडिया जनरेशन आणि सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पिल्लई एज्युकेशन इन्स्टिट्यूट रसायनीचे प्रा. गणेश शिंदे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी प्रथम सत्रात आयडिया जनरेशनमध्ये एखादा व्यवसाय सुरू करताना सभोवतालच्या गरजांचा अभ्यास करून नवकल्पनांच्या साह्याने व्यवसाय कसा सुरू करावा, याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सायबर गुन्हेगारी याबाबत सोशल मीडियाचा वापर करून असभ्य मजकूर, द्विट, पोस्ट कशा प्रकारे केले जातात, होणारी फसवणूक कशी टाळावी. कायद्यानुसार कोणती शिक्षा आहे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

यावेळी पिल्लई एज्युकेशन इन्स्टिट्यूट रसायनी या संस्थेचा डी जे सामंत महाविद्यालय पाली रत्नागिरी यांच्या सोबत सामंजस्य करार झाला. वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. भूषण पाध्ये यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कला आणि वाणिज्य शाखेचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. अवनी नागले यांनी सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा तांबे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 17/Mar/2025