सावर्डे : तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या यूथ गेम्समध्ये टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूरने वरचष्मा राखला आहे तर बॅडमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम व सातारा जिल्हा द्वितीय स्थानावर राहिला आहे.

टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे : टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरचे संकल्प बांदिवडेकर, जयराज काजरेकर व साताऱ्याचा अथर्व कदम तर मुलींमध्ये कोल्हापूरच्या गीत जगताप, निहारिका कुलकर्णी व साताऱ्याची अरूंधती फाळके; १७वर्षांखालील मुलींमध्ये कोल्हापूरची जान्हवी भोसले, साताऱ्याची अरुंधती फाळके व कोल्हापूरची निहारिका कुलकर्णीः १३ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरचे संकल्प बांदिवडेकर, पुष्पम शाह व राजवीर गायकवाड तर मुलीमध्ये कोल्हापूरची गीत जगताप व साताऱ्याच्या श्रावणी माईन व मुक्ता शेवडे; ११ वर्षांखालीलमध्ये कोल्हापूरचे पुष्पम शाह, शुभंकर जाधव व राजवीर गायकवाड तर मुलींमध्ये साताऱ्याच्या श्रावणी माईन, श्रेया माईन व आद्या मराठे यांनी टेबल टेनिसमध्ये यश प्राप्त केले. बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये कांदिवली मुंबईचा पारस राणे, साताऱ्याचा पियुष पाटील व सांगलीचा समर्थ सावंत ११ वर्षांखालील सिंधुदुर्गचे विनय परब, मानस शिरसाट व डेरवणचा श्रीवल्लभ मुणगेकर तर मुलींमध्ये साताऱ्याच्या शरयू कदम, विभावरी कांबळे व सिंधुदुर्गची निरजा पवार, १५ वर्षांखालील मुलींमध्ये सिंधुदुर्गच्या रिया परब, स्वरा म्हाडगुत व रत्नागिरीची अनुष्का कदम, १३ वर्षांखालील मुलांमध्ये सांगलीचा ईशान घेराडे, रत्नागिरीचा वेद देशमुख व सिंधुदुर्गचा अभ्यंग मसुरकर तर साताऱ्याच्या शरयू कदम, विभावरी कांबळे व सिंधुदुर्गची निरजा पवार यांनी बॅडमिंटन स्पर्धेत यश प्राप्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 17/Mar/2025











