रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात ७ छोटे इलेक्ट्रीकटेम्पो दाखल झाले आहेत. लवकरच हे टेम्पो शहरातील कचरा उचलण्यासाठी कार्यरत होणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगलीतील एका कंपनीकडून हे टेम्पो मिळवून दिले आहेत. या गाड्या पर्यावरणपूरक विद्युत ऊर्जेवर चालणार असल्याने इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत करणाऱ्या ठरणार आहेत.
रत्नागिरी शहरांमध्ये दररोज सरासरी २० ते २२ टन कचरा गोळा होतो. उत्सव, यात्रांच्या दिवशी याहीपेक्षा जास्त कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडे २२ लहान मोठ्या घंटा गाड्या आहेत. यामध्ये आता आणखी ७ इलेक्ट्रीक टेम्पोंची भर पडली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून सांगली येथील केपीटी कंपनीकडून हे टेम्पो मिळाले आहेत. केपीटी कंपनीच्या सामाजिक आरोग्य आणि कल्याणासाठी असलेल्या सामाजिक बांधिलकी फंडातून हे टेम्पो मिळाले आहेत. या कंपनीने काही ग्रामपंचायतीनाही टेम्पो दिले आहेत. त्यामुळे स्वच्छतेमध्ये आणखी वेग येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 17/Mar/2025













