Mumbai Indians Champion, WPL 2025: महिलांची फ्रँचायझी टी२० स्पर्धा WPLच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनेदिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभूत केले आणि दुसरे विजेतेपद जिंकले. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ६६ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ७ बाद १४९ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना मारिझेन कापच्या ४० धावांच्या बळावर दिल्लीला २० षटकात १४१ धावाच करता आल्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवत WPL ट्रॉफी उंचावली. हरमनप्रीत सामनावीर ठरली तर मुंबई संघाची नॅट स्कायव्हर-ब्रंट मालिकावीर ठरली. विजेते, उपविजेते आणि इतर पुरस्कार विजेत्यांना किती रक्कम मिळाली? जाणून घेऊया.
विजेत्यांची यादी आणि बक्षीसाची रक्कम
- विजेते – मुंबई इंडियन्स – ६ कोटी रूपये
- उपविजेते – दिल्ली कॅपिटल्स – ३ कोटी रूपये
- मौल्यवान खेळाडू – नॅट स्कायव्हर-ब्रंट – ५ लाख रूपये
- ऑरेंज कॅप – नॅट स्कायव्हर-ब्रंट – ५ लाख रूपये
- पर्पल कॅप – अमेलिया केर – ५ लाख रूपये
- उदयोन्मुख खेळाडू – अमनजोत कौर – ५ लाख रूपये
- सर्वोत्तम स्ट्राइक रेट – शिनेल हेनरी – ५ लाख रूपये
- सर्वाधिक षटकार – अशले गार्डनर – ५ लाख रूपये
- सर्वोत्तम झेल – अनाबेल सदरलँड – ५ लाख रूपये
- सर्वाधिक निर्धाव चेंडू (डॉट बॉल्स) – शबनिम इस्माइल – ५ लाख रूपये
- फेअर प्ले अवार्ड – गुजरात जायंट्स
