थिबा पॅलेस येथे थ्रीडी मॅपिंग मल्टिमिडिया शोचे भव्य लोकार्पण !

रत्नागिरी : थिबा पॅलेस (रत्नागिरी) येथे थ्रीडी मॅपिंग मल्टिमिडिया शोच्या विकासकामांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या भव्य शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर तसेच कोकणातील भारतरत्न प्राप्त महान व्यक्तींच्या कार्यावर आधारित थ्रीडी मल्टीमीडिया शोच सादरीकरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संकल्पनेचे भरभरून कौतुक करत, कोकणाच्या पर्यटन विकासासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरेल, असे गौरवोद्गार काढले. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रत्नागिरीकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 18/Mar/2025