रत्नागिरी : रत्नागिरीतील तारांगणप्रमाणे राज्यातील काही शहरांमध्ये तारांगण बांधण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पालकमंत्री उदय सामंत यांनी तारांगणासारखे प्रकल्प रत्नागिरीत उभारुन संपूर्ण राज्याला त्यांच्या कामाची झलक दाखवून दिली आहे. त्यांच्या कामामुळे रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलत असल्याचे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, खा. सुनील तटकरे, आमदार शेखर निकम यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तारांगणातील शो चा आस्वाद घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी नगर परिषदेच्या शिवसृष्टी, थ्रीडी मॅपिंग मल्टिमीडिया शो अशा विकासात्मक कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी माळनाका येथील तारांगणला भेट दिली. येथील विज्ञान गॅलरीसह तारांगणातील सर्व परिसराची पाहणी केली. त्यानंतर तारांगणातील शो चा आस्वाद घेतला. तारांगणात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आ. शेखर निकम यांचे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, विद्युत तथा वाहन विभागाचे अधिकारी जितू विचारे यांनी स्वागत केले.
राज्यातील अनेक शहरांमध्ये असे तारांगण असावे…
तारांगण शो पाहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रत्नागिरीतील तारांगणाची स्तुती केली, राज्यातील अनेक शहरांमध्ये असे तारांगण असावे, अशी इच्छा व्यक्त करून त्या दिशेने कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 18/Mar/2025
