मंडणगड : मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध प्रभागात मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. १३ मार्च रोजी कोंझर येथे विहिरीस संरक्षक भिंत बांधणे (अंदाजपत्रक रक्कम २५ लाख), मुख्य पाट रस्ता ते जॅकवेलकडे जाणार रस्ता खडी डांबरीकरण करणे (अंदाजपत्रक रक्कम १५ लाख), प्रभाग क्रमांक १७तुरेवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे (अंदाजपत्रकीय रक्कम १० लाख) या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, बांधकाम सभापती राजेश्री सापटे, पाणी पुरवठा समिती सभापती सुभाष सापटे, महिला बालकल्याण सभापती समृध्दी शिगवण, नगरसेवक मुकेश तलार, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 18/Mar/2025
