संगमेश्वर : शिवने- करंबेळे यात्रेनंतर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

साडवली : संगमेश्वर देवरूख या राज्यमार्गावर शिवने करंबेळे गावांच्या सीमेवर पालखी भेट सोहळा झाला. याप्रसंगी मोठी यात्रा भरली होती. या यात्रास्थळी कचरा साचला होता. बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. १७) या यात्रा परिसराची साफसफाई केली. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या स्वच्छता मोहिमेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

या यात्रेदरम्यान अनेक दुकाने थाटलेली असल्याने प्लास्टिक बाटल्या, कागद, प्लास्टिक रॅपर अशासारखे विविध टाकाऊ पदार्थ तिथेच टाकून व्यापारी निघून जातात. त्यामुळे यात्रेनंतर जवळजवळ एक किमीच्या अंतरात रस्त्याच्या दुतर्फा कचरा पाहायला मिळतो. हा कचरा साफसफाई करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांअभावी शक्य नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. या साफसफाई मोहिमेदरम्यान मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, संदीप नटे, शिवने सरपंच राजू पवार, उपसरपंच अमोल रसाळ, पोलिसपाटील मनोज शिंदे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 18/Mar/2025