गुहागर : वेळंब अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

गुहागर : वेळंब घाडेवाडी तर्फे वेळंब अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन डोंगरी कार्यक्रम जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे यांच्या हस्ते झाले. डोंगरी विकास कार्यक्रम योजनेंतर्गत वेळंब घाडेवाडीतर्फे वेळंब येथील अंगणवाडी इमारत बांधणे काम भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय नातू, डोंगरी कार्यक्रम जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे व तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे. यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, उपसरपंच श्रीकांत मोरे, अमित ओक, बूथ प्रमुख समीर वेल्हाळ, मकरंद ओक, दीपक मोरे, वसंत माळी संजय गुरव, ग्रा. पं. सदस्या वैष्णवी घाडे, अनिता घाडे, भाग्यश्री घाडे, यशवंत बारगोडे, श्रीकांत घाडे, मदन साळुंखे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन दीपक मोरे यांनी केले. येथील अंगणवाडी इमारतीचे काम हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच गावचे उपसरपंच श्रीकांत मोरे व त्यांचे सहकारी ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे. तसा लेखी पत्रव्यवहार देखील आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 18/Mar/2025