संत रोहिदास महाराजांचे विचार आत्मसात करा : दिनेश शिरीषकर

चिपळूण : संत शिरोमणी श्री रोहिदास महाराजांनी आपल्या समाजाला विचारात्मक दिशा दिली आहे. यामुळे सर्वांनी संत रोहिदास महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, असे प्रतिपादन समाजसेवा संघाचे अध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी केले.

रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागातर्फे भेलसई विठ्ठल रखुमाई मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाप्रसंगी संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज जयंती व समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यावेळी निरबाडे येथील ज्येष्ठ समाजबांधव भिकाजी मासवकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातगाव विभागातील व्यावसायिक समाज बांधवांचा देखील
संत शिरोमणी श्री रोहिदास महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

विभाग अध्यक्ष संतोष सावर्डेकर यांनी सातगाव विभागाच्या वाटचालीचा आढावा घेताना समाज बांधव विविध व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. जीवनगौरव पुरस्कार ही संकल्पना दरवर्षी संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाप्रसंगी राबवली जाईल, असे सांगितले.

या वेळी शाहीर नथुराम खेडेकर यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जीवन चरित्रावर शाहिरीच्या माध्यमातून उत्तम गीत सादर केले. या वेळी उपाध्यक्ष शंकर कदम, प्रभाकर पेवेकर, कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, खजिनदार गणेश कदम, सदस्य संजीवन कदम, पांडुरंग पेवेकर, गणेश कदम, काशीराम कदम, संतोष कदम, विजय सुसवीरकर, नथुराम खेडेकर, महेश पेवेकर, सखाराम कोंडविलकर, उमेश पेवेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 18/Mar/2025