रत्नागिरी : आज शिवसेना माजी जि.प.अध्यक्ष श्री.जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. खरतर आबांनी हा निर्णय का घेतला हे अनाकलनीय आहे, पण आता घेतलाय तर त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. नाचणे सह संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात सामान्य शिवसैनिक आज सुद्धा जिथे आहेत तिथेच आहेत. कोणीही नेते जरी अन्य पक्षात गेले तरी सामान्य शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. शिवसैनिक जोमाने काम करतायत हे मागील लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याने दाखवून दिले आहे. आदरणीय पक्षप्रमुख लवकरच विधानसभेसाठीचा उमेदवार जाहीर करतील, तेव्हा सर्व शिवसैनिक अधिक जोमाने काम करून रत्नागिरी विधानसभेवर भगवा फडकवतील यात शंका नाही, असा विश्वास शिवसैनिक डॉ. प्रतिक झिमण यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 05-10-2024