चिपळूण : रामपूर बौद्धवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या अन् एका बोकडाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सकाळी दहाच्या दरम्यान घडला. तालुक्यातील विविध भागात बिबट्याने मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरे तसेच ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तोंडली येथे बिबट्याने ग्रामस्थावर केलेल्या हल्ल्यात बिबट्याचाच मृत्यू झाला. तोंडली येथील दीड वर्षे वयाची मादी होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी करून खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर रामपूर बौद्धवाडी येथेही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये शेतकरी अतिश अरुण जाधव यांच्या पाच बकऱ्या, एक बोकड फस्त केला. बौद्धवाडी पाठीमागील रानात बिबट्याने बकऱ्यांचे लचके तोडले. घटनास्थळी वनधिकारी राजाराम शिंदे, पोलिस पाटील दीप्ती जाधव यांनी पंचनामा केला. या घटनेत जाधव यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने राहिल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी सरपंच स्मिता जाधव यांच्या वाड्यात येऊन बिबट्याने रात्री गाईचे वासरूदेखील मारले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 19/Mar/2025














