डेरवण यूथ गेम्स : रत्नागिरी, सिंधुदुर्गने बुद्धिबळमध्ये मारली बाजी

चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या यूथ गेम्समध्ये झालेल्या बुद्धिबळ या खेळात रत्नागिरी व सिंधुदुर्गने बाजी मारली. या स्पर्धेत गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर येथून खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा सात गटांमध्ये झाली. या स्पर्धेत तब्बल १२४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदक विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे : १६ वर्षांखालील गटात रत्नागिरी येथील सर्वेश दामले, सई देव, यथार्थ डांगी तर मुलींच्या गटात निराली पटेल, गार्गी सावंत व चिन्मयी देवधर यांना गौरविण्यात आले. तर १५ वर्षांखालील वयोगटात चेतन भोगटे, पुष्कर केळुस्कर, नंदन दामले यांना तर १२ वर्षांखालील गटात अथर्व वेंगुर्लेकर, चिदानंद रेडकर व राघव पाध्ये; तसेच ९ वर्षांखालील गटात पारस मुंडेकर, अशुतोष कुलकर्णी, अर्णव कांबळी यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन गटातील हर्षवर्धन भिंगे याला सुवर्ण, आरिफ दिवेकर याला रौप्य व तनिष तेंडुलकर याला कांस्यपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त ९ खेळाडू
या स्पर्धेत सहभागी झालेले ९ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त होते. या स्पर्धेतील सर्वोच्च गुणांकन प्राप्त खेळाडूला १५१६ गुणांकन प्राप्त होते. त्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची आणि रंगतदार झाली. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने आपले कौशल्य पणाला लावलेले दिसून आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे परीक्षक विवेक सोहनी यांनी या स्पर्धेचे कामकाज पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 19/Mar/2025