संगमेश्वर : आंबव पोंक्षे येथे २२ रोजी शिंपणे

संगमेश्वर : तालुक्यातील माखजन परिसरात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. आंबव पोंक्षे येथे २२ रोजी शनिवारी शिंपणे होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. सध्या गावामध्ये पालखी गाव भोवणी ला फिरत आहे.२२ रोजी गावभोवणी चा अखेर चा दिवस असून यादिवशी रात्री गुरव वाडी येथे रात्रभर पालखी नाचवण्याचा सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी प्रथेप्रमाणे ग्रामदेवतेच्या मंदिरात जाईल. शिंपण्याला उपस्थित राहावे असे आवाहन खोत, गावकरी मंडळी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 19/Mar/2025