रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा ३१ मार्चला स्नेह मेळावा

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मार्च महिन्याचा स्रेह मेळावा सण उत्सवामुळे शेवटच्या शनिवारी न होता सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक भवनात संपन्न होणार आहे. यावेळी मार्च महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सदस्यांचे सत्कार करण्यात येतील. तसेच संघाच्या नवीन उपक्रमाविषयी चर्चा करण्यात येईल. विशेषतः नवीन सभासद नोंदणी आणि गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघाची चळवळ तसेच ज्येष्ठांचा हक्काचा मार्गदर्शक असलेल्या फेस कॉम च्या मनोहरी मनो युवा मासिकाचे नवीन वर्गणीदारांची नोंदणी करून घेण्यात येईल. या मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे आणि उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 19/Mar/2025