डॉलरची ऐतिहासिक घसरण; रुपया रचणार इतिहास?

Dollars pride is broken : ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने घसरण होणाऱ्या शेअर बाजाराला अखेर काल ब्रेक लागला. सेन्सेक्स सुमारे ११३० पॉईंटने वधारल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे भारतीय रुपया देखील मजबुतीकडे वाटचाल करत आहे. वास्तविक, बुधवारी ३ दिवसांच्या वाढीनंतर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरणीसह व्यवहार करत असला तरी, येत्या काही दिवसांत रुपया इतिहास रचताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत ट्रम्प सत्तेवर येणे आणि डॉलर मजबूत करण्याच्या मोहिमेतील हे सर्वात मोठे यश असेल.

रुपयाची किंमत भविष्यात आणखी वधारणार
तज्ज्ञांच्या मते सध्या भारताचा मॅक्रो डेटा जगातील इतर देशांपेक्षा आणि अगदी अमेरिकेपेक्षाही चांगला दिसत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा फायदाही येत्या काही दिवसांत पाहायला मिळू शकतो. गेल्या काही दिवसांबद्दल बोलायचे झाले तर, रुपयाच्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे गर्वहरण झालं असून बाजारात चांगलीच वाढ झाली आहे. तीन व्यापार सत्रांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ०.७६ टक्क्यांनी वाढला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यातील नीचांकी कालावधीच्या तुलनेत रुपया दीड टक्क्यांहून अधिक वधारला आहे. जर अंदाज खरा ठरला तर डॉलरच्या तुलनेत ही रिकव्हरी २ टक्क्यांहून अधिक असू शकते.

बुधवारी रुपयाची घसरण
बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी घसरून ८६.६६ वर आला. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी यूएस चलन निर्देशांकातील मजबूती आणि जागतिक व्यापार शुल्काच्या हालचालींवरील सतत चिंता यामुळे ही घसरण झाली. विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आणि देशांतर्गत शेअर बाजारात काही प्रमाणात विदेशी भांडवलाच्या ओघाने स्थानिक चलनाला आधार मिळाला. इंटरबँक फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये, रुपया ८६.६० वर कमकुवत उघडला आणि ८६.६८ पर्यंत घसरण्यापूर्वी सुरुवातीच्या सौद्यांमध्ये डॉलरच्या तुलनेत ८६.६६ वर व्यापार करत होता. त्याच्या मागील बंदच्या तुलनेत ही १० पैशांची घसरण आहे.

त्याआधी डॉलरच्या तुलनेत रुपया सलग ३ दिवस वधारत आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवत रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २५ पैशांनी वाढून ८६.५६ वर बंद झाला. तीन दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपया ६६ पैशांनी वाढला. गुरुवारी मागील सत्रात १७ पैशांनी वाढून ८७.०५ वर बंद झाल्यानंतर सोमवारी रुपया २४ पैशांनी वाढून ८६.८१ वर बंद झाला. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८७.९४ ही लाईफटाईम नीचांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून रुपयात १.५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

डॉलरचे गर्वहरण
दुसरीकडे, डॉलरच्या निर्देशांकात सातत्याने घसरण सुरू आहे. बुधवारी थोडीशी वाढ दिसून येत असून तो १०३ च्या वर व्यवहार करत आहे. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा अमेरिकन डॉलर निर्देशांक ०.१५ टक्क्यांनी वाढून १०३.३९ वर व्यापार करत होता. मात्र, जानेवारी महिन्यात डॉलर निर्देशांक ११०.१८ चा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून डॉलर ६ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापासून बाजारातील सहभागी संकेतांची वाट पाहत असल्याने डॉलर निर्देशांकात सुधारणा झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 19-03-2025