Breaking : आता MPSCमध्येही कॅलेंडर; भविष्यात मोठी एमपीएससी भरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षा संदर्भात मोठी घोषणा केली. एमपीएससीकडून स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.

पण, सध्या एमपीएससीच्या कारभारावर टीका सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत आहे. परीक्षेचे टाईमटेबल, निकाल यामध्ये होणारी दिरंगाई यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन आमदार शिवाजीराव गर्जें यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर देत मोठ घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीबाबत मोठी घोषणा केली. तसेच आता युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीमध्येही कॅलेंडर आणणार असल्याचे जाहीर केले. येणाऱ्या काही दिवसात एमपीएससी मार्फत मोठी भरती घेणार असल्याची त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, युपीएससी प्रमाणेच आता एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे असा प्रयत्न आहे. एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. तसेच एमपीएससी महामंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ॲड देतो आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

एमपीएससीमार्फत भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया करतोय, तसेच, परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केलं, तरी देखील मी मान्य करतो की अजून वेगाने काम करू, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 19-03-2025