चिपळूण : शिवसेना नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव विधानसभेच्या अर्थसंकल्पीय यांनी अधिवेशनात कोकणातील विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठविला. यावेळी त्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदार व मच्छीमार यांच्या समस्या मार्गी लागवण्यासाठी विशेष मागण्या मांडल्या व त्यांच्या समस्या सभागृहासमोर मांडल्या. यावेळी गेल्या दोन वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या काजू मंडळासाठी आ. जाधव यांच्या तारांकीत प्रश्नामुळे काजू मंडळासाठी तब्बल ८८ कोटी इतक्या रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केल्याचे सभागृहात राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे.
काजू मंडळाच्या भागभांडवलाकरिता व काजू फळ पीक योजनेअंतर्गत केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून हे ८८ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. राज्यात १६ मे २०२३ रोजी शासनाने काजू मंडळाची स्थापना केली. मंडळ स्थापन झाले तरी शासनाने त्याद्वारे कोणतेही काम सुरू केले नव्हते. काजू बॅण्ड तयार करून त्याची जाहीरात करणे, काजूला जी. आय. मानांकन विस्तार करणे, काजू प्रक्रिया उद्योग उभारणे, उपपदार्थ तयार करणे व काजू आहे.
व्यापाराला चालना देणे ही कामे या मंडळाच्या माध्यमातून होणे अपेक्षित असताना हे मंडळ केवळ कागदावर होते. आ. जाधव यांनी याप्रश्नी विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केला होता. वेळेअभावी हा प्रश्न चर्चेला आला नाही. मात्र, त्याचे लेखी उत्तर ना. जयकुमार रावल यांनी आ. भास्कर जाधव यांना दिले आहे. त्यात काजू मंडळाच्या माध्यमातून विविध कामांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काजू मंडळाला ८८ कोटी मंजूर झाल्याने कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 20/Mar/2025














