पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील श्री देव रवळनाथ आणि पावसची ग्रामदेवता नवलादेवी यांची भेट परशुराम मंदिराजवळ भाविकांच्या उपस्थितीत झाली. या वेळी परशुराम सेवा मंडळाचे महिला व पुरुष सुमारे २५ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
शिवाय पूर्णगड पोलिस ठाण्याचे रत्नदीप साळोखे व सहकारी यांनीही मोलाचे सहकार्य केले. त्याचवेळी रनपारची ग्रामदेवता जाकादेवीचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यामुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. परशुराम महिला लेझीम नृत्य पथकाने नृत्याविष्कार सादर केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 20/Mar/2025














