रत्नागिरी : पुरेशा प्रमाणात लिपिक शिपाई तसेच सफाई कर्मचाऱ्यांची भरती करा. द्विपक्ष बोलणे पुनस्र्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया बैंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुकारण्यात आलेला संप रत्नागिरीत यशस्वी झाला. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी शहरातील आरोग्यमंदिर येथील झोनल ऑफिस समोर महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शना केली.
बैंक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी अत्यंत अपुऱ्या प्रमाणात आहेत. सफाई कर्मचाऱ्यांचे पद बैंक ऑफ महाराष्ट्रमधून रद्द करण्यात आले आहे. आज 800 शाखांमधून शिपाई कर्मचारी नाहीत, 300 शाखांमधून लिपिकच नाही तर बाराशेच्या आसपास शाखांमध्ये केवळ एकच लिपिक काम करत आहे. इतक्या अपुरे आणि तुटपुंजे कर्मचारी असलेल्या शाखांमधून काम करत असते वेळी कामाचा ताण प्रचंड वाढलाय. कर्मचाऱ्यांना रजा घेता येत नाही. त्यामुळे बँकेतील वाढलेला कामाचा ताण आणि खाजगी आयुष्य या मधील समतोल ढळत चालला आहे. त्याचा ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होतो आहे. नित्यनेमाची काम आउट सोर्सिंग द्वारे निभावली जात आहेत. त्यामुळे बँकेच्या प्रोसिजरमध्ये तडजोड करावी लागते. त्यातून ऑपरेशनल रिस्क तसेच ऑपरेशनल फ्रॉड वाढण्याचा धोका संभवतो. या सर्वांचा बँकेच्या एकूणच परफॉर्मन्सवर अनिष्ट परिणाम होतो म्हणून पुरेशा प्रमाणात सर्व स्तरावरील नोकरी भरती केलीच पाहिजे ही प्रमुख मागणी या संपामध्ये करण्यात आली.
त्याचबरोबर संघटनेबरोबर झाल्या करारानुसार स्पेशल असिस्टंटच्या जागा बैंक गेली दहा वर्ष भरतच नाही. त्या त्वरित भरल्या पाहिजेत. बैंकमध्ये 40 वर्षांहून जास्त काळ असलेली मान्यता प्राप्त संघटनेची कार्यालय बँकेने जबरदस्तीने ताब्यात घेतली. ती संघटनांना परत करावी. संघटनेच्या प्रतिनिधित्व बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सहा महिन्यांपासून अधिक काळ झाली तरी देखील बँक सुरू करत नाही. आज बैंक न्यायालयाचे निर्णय, लेबर कोर्टाचा निर्णय, शासकीय यंत्रणाच्या आदेश मानायला तयार नाही. संघटना आणि बँकांमध्ये तडजोड करण्याची लेबर कमिशनर सोबत झालेल्या तीन चर्चेच्या फेरीमध्ये बँकेने आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे आजचा हा देशव्यापी संप अटळ बनला असल्याचे सांगत बँकेच्या प्रतिनिधींनी या संपामुळे ग्राहकांची गैरसोय झाल्याबद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त केली. तर न्याय आणि रास्त मागण्या उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यासाठी महा बँकेच्या विविध कार्यालयासमोर देशभर निदर्शने करण्यात आली. रत्नागिरीमध्ये आरोग्यमंदिर येथील झोनल ऑफिससमोर महा बँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. या संपाचा निदर्शनाचे नेतृत्व राजेंद्र गडवी आणि भाग्येश खरे या संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 20/Mar/2025











