काँग्रेसपासून सावध राहा, कारण त्यांना फक्त लुटणं माहीत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसला फक्त लुटणं माहीत आहे. गरिबांना गरीब ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा” असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.

तसेच “दिल्लीमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. दु:खद गोष्ट म्हणजे त्याचा म्होरक्या काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे” असं सांगत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

“काँग्रेसला फक्त लुटणं माहीत आहे. गरिबांना गरीब ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहेत. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. आपली एकताच समाजाला वाचवेल. महाराष्ट्रातील लोकांना काँग्रेसचा आणखी एक कारनामा सांगायचा आहे. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल. दिल्लीमध्ये हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडलं. दु:खद गोष्ट म्हणजे त्याचा म्होरक्या काँग्रेसचा नेता निघाला.”

“काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आणि जिंकायच्या आहे. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात त्यांचा आशीर्वाद घेण्याचं सौभाग्य मिळालं. मी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचं आशीर्वाद घेतलं. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत आहे.”

“आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जयंती आहे. गेल्यावर्षी त्यांची ५०० वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन करतो. हरियाणामध्ये मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं. तुमचं मत हरियाणाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाईल. २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. पोहरादेवीच्या आशीर्वादाने मला आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मदत देता आली आहे. महाराष्ट्रातील ही योजना नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवत आहे. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो. त्यांनी सरकार असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती.”

“आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात, भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावली आहेत. कला, संस्कृती, राष्ट्र रक्षा, व्यापारात या समाजाजील महापुरुषांनी सर्व काही केलं आहे. काँग्रेसचे विचार नेहमी विदेशी राहिले आहेत. ते दलित, मागस लोकांना आपलं मानत नाही. त्यांनी बंजारा समाजाविषयी नेहमी दुप्पटी भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेला ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर ही योजना सुरू झाली आहे” असंही मोदींनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 05-10-2024